हिंगोलीत महिला आता निर्भय, सुरक्षित

जिल्ह्यात पोलिस अधीक्षक राबविणार जननी अभियान
 women safe
women safesakal

हिंगोली : कायदे कठोर असतानाही महिलांवर अत्याचार होतात. महिलांना निर्भयपणे जगता यावे, त्यांना सुरक्षित वाटावे, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात जननी अभियान राबविण्यात येणार आहे. या स्तुत्य अभियानामुळे महिलांवरील अन्याय अत्याचारांवर नियंत्रण मिळणार आहे.जिल्ह्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक कलासागर यांनी सर्व पोलिस ठाणे हद्दीतील गावांमध्ये जननी महिला सक्षम समाज अभियान राबविण्यात येणार आहे.

यामध्ये प्रत्येक गावात पोलिस अधिकारी कर्मचारी जाऊन व्हीडिओ प्रजेंन्टेशन, बॅनर, पोस्टर, समुपदेशन करून महिलांच्या कायद्याविषयी जनजागृती केली करणार आहेत. ज्या गावात एकटी ज्येष्ठ महिला राहत असेल तिला कोणी नातेवाईक नसेल अशा महिलांच्या महिला पोलिस कर्मचारी संपर्कात राहणार आहेत. रोजंदारी करणाऱ्या महिलांवर अत्याचार, बालकाचे शोषण, जादूटोण्याचे आरोप, विनयभंग आदी प्रकार होऊ नये, यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. शाळा महाविद्यालयातही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अवघ्या दहा मिनिटांत मदत

महिला, मुली अडचणीत असतील आणि हेल्पलाइन क्रमांवर संपर्क केल्यास अवघ्या दहा मिनिटांत पोलिस मदतीसाठी घटनास्थळी पोचणार आहेत. याबाबत जिल्ह्यातील १३ पोलिस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले आहे. महिलांवर होणारे अन्याय तसेच अत्याचार भविष्यात या अभियानामुळे कमी होणार आहेत. हे अभियान राबविण्यात पोलिस अधिकाऱ्यांसमवेत महिला कर्मचाऱ्यांच्या ही नियुक्त्या केल्या जाणार आहेत. इतर महत्त्वाचे कायदे

हुंडा प्रतिबंधक कायदा

कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा

विशाखा गाईड लाईन्स देवदासी प्रतिबंधक कायदा

लिंग निदान प्रतिबंधक कायदा,

बालविवाह प्रतिबंधक कायदा

विनयभंग

कलम ३५४ - विनयभंग - शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न (१ ते ५ वर्षाची शिक्षा).

कलम ३५४ (बी) - विनयभंग करण्यासाठी हल्ला करणं (३ ते ४ वर्षे शिक्षा).

कलम ३५४ (सी) - महिलांना आक्षेपार्ह स्थितीत पाहणे (३ ते ४ वर्षे शिक्षा).

कलम ३५४ डी - पाठलाग करणे (हे कृत्य एकदा केल्यास, पहिल्यांदा ३ वर्षे, तर दुसऱ्यांदा केल्यास ५ वर्षे शिक्षा होऊ शकते.)

कलम ३५४ अ - शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं (या बळजबरीसाठी तीन वर्षे शिक्षा होऊ शकते.)

जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने महिलांवर अन्याय व अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी हे अभियान राबविले जाणार आहे. जिल्ह्यात जननी अभियानासाठी अनेकांची मदत घेतली जाणार आहे.

राकेश कलासागर, जिल्हा पोलिस अधीक्षक

अत्याचार

कलम ३७६ - बलात्कार - सात वर्षे ते जन्मठेप इतकी शिक्षा होऊ शकते.

कलम ३७६ (डी) - सामूहिक बलात्कार (जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)

कलम ३७६, ३०२ - बलात्कार करून हत्या - (यासाठीही जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)

कलम ३७७ - अनैसर्गिक अत्याचार (जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com