Movie Review : 'छावा' चित्रपटात इतिहासाची चुकीची मांडणी करण्यात आल्याचा आरोप इतिहास अभ्यासक प्रा. शिवानंद भानुसे यांनी केला आहे. चित्रपटातून इतिहासाच्या विकृतीकरणामुळे नव्या पिढीसमोर चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर : ‘छावा’ चित्रपटातून खोटा आणि चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडल्याचा आरोप इतिहास अभ्यासक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रा. शिवानंद भानुसे यांनी केला आहे.