
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची शान असलेल्या ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर रविवारी ६५ इतिहासप्रेमींनी स्वच्छता मोहीम राबविली. यात २२ गोण्या कचरा गोळा करण्यात आला. संकलित कचऱ्यात मुख्यतः पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या आणि काचेच्या बाटल्यांचा समावेश होता. हा कचरा पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आला. त्याची दौलताबाद ग्रामपंचायतीने विल्हेवाट लावली.