

छत्रपती संभाजीनगर : अवघे शहर धुळवडीला रंगांची उधळण करण्यासाठी सज्ज झाले असताना सूर्यही आपला उष्ण रंग दाखवू लागला आहे. गुरुवारी (ता. १३ ) या महिन्यातील सर्वोच्च ३९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर किमान तापमानही २२ अंशांवर पोचल्याने शहरवासीयांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.