
छत्रपती संभाजीनगर : ‘मै इस एरियाका डॉन हूँ...’ असे म्हणत गुंडाने साथीदारांच्या मदतीने हॉटेलमधील वेटरवर चाकूने हल्ला केला. ता. ५ जूनला रात्री सव्वादहाला जुना मोंढ्यातील जनता हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी चार आरोपींवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.