पतीने केले दुसरे लग्न; खात्री करण्यास गेलेल्या विवाहितेस मारहाण करत विनयभंग | Crime News

पतीसह दोन महिलांनी फिर्यादी विवाहितेस बेदम मारहाण केली.
crime
crimeesakal

छत्रपती संभाजीनगर : पत्नीला नांदवत नसल्याने ती माहेरी राहत होती, मात्र पत्नी घरात नसल्याचा हाच फायदा घेत पतीने परस्पर दुसरे लग्न केले. ही बाब पहिल्या पत्नीला माहीत होताच तीने खात्री करण्यासाठी पतीच्या घरी धाव घेतली असता तीला पतीसह दोन महिलांनी बेदम मारहाण केली.

crime
Akshaya Tritiya 2023: उत्सव अक्षयदानाचा

तर नात्यातीलच एकाने विवाहितेचे कपडे ओढत तिचा विनयभंग केला. ही घटना २८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान मुकुंदनगर, मुकूंदवाडी येथे घडली. याप्रकरणी तिघांविरोधात मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

crime
Viral Video : ...अन् क्षणात पकडला 15 फुटाचा महाकाय अजगर; झोप उडवणारा व्हिडिओ

शंकर गायकवाड आणि इतर दोन महिला अशी त्या तिघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिला सासरचे मंडळी नांदवत नाहीत. पती नेहमी भांडण करुन मारहाण करतो. दरम्यान पती नांदवत नसल्याने विवाहिता तिच्या माहेरी राहते. दरम्यान विवाहितेच्या पतीने दुसरे लग्न केल्याची माहिती तिला मैत्रिणीकडून मिळाली.

त्यावर फिर्यादी विवाहितेने खात्री करण्यासाठी पतीच्या घरी गेली असता, तिथे शंकर गायकवाड आणि इतर दोन महिलांनी तिला मारहाण केली. तसेच एका नात्यातील आरोपीने विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पंकज मोरे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com