ॲड. दिलीप कांबळे यांना
आदर्श समाजसेवक पुरस्कार
धाराशिव, ता. २० : सातेफळ (ता. कळंब) येथील ग्रामीण साहित्यिक व ‘वैरदावा’कार ॲड. दिलीप कांबळे यांना काव्यांगण साहित्य मंचतर्फे दिला जाणारा आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी साहित्य, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या सेवेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मंचचे संस्थापक अध्यक्ष विकास राठोड यांनी या पुरस्काराची घोषणा केली. हा पुरस्कार सोहळा रविवारी (ता.२५) उमरगा येथील पोदार इंग्लिश स्कूल येथे काव्यांगण दीपोत्सव राज्यस्तरीय कवी संमेलनात पार पडणार आहे. संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, उद्घाटक आमदार प्रवीण स्वामी, स्वागताध्यक्ष प्राचार्य बी. पी. सिंग, तसेच डॉ. संजय राठोड व सुवर्णा पवार आदींच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाईल. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा. रवी सुरवसे, प्रा. राजा जगताप, विजय गायकवाड, तुकाराम गंगावणे, जयराज खुणे, ॲड. विश्वजित शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील साहित्यिक व मित्रपरिवाराकडून ॲड. कांबळे यांचे अभिनंदन करण्यात आले.
......
फोटो ः ॲड. दिलीप कांबळे
OSM26B07250