बेकायदा बांधकामांच्या सर्वेक्षणाला आठवडाभराची मुदत

बेकायदा बांधकामांच्या सर्वेक्षणाला आठवडाभराची मुदत
Published on: 
बेकायदा बांधकामांचे आठ दिवसात सर्वेक्षण महापालिका आयुक्तांचे वॉर्ड अधिकारी, इमारत निरीक्षकांना आदेश छत्रपती संभाजीनगर, ता. ३ ः शहरातील प्रत्येक भागात सुरू असलेले बेकायदा बांधकामे रोखण्याची जबाबदारी संबंधित वॉर्ड अधिकारी व इमारत निरीक्षकांची असून, येत्या आठ दिवसांत नव्या बांधकामांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करा, असे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले. बांधकामे नियमित करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी सूचना आयुक्तांनी बैठकीत दिली. चिकलठाणा परिसरात जालना रोडवर एका बेकायदा बांधकामाचा स्लॅब कोसळून त्याखाली दबून मजुराचा मृत्यू झाला. मजुराचा मृतदेह काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल ३६ ते ४० तास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. या पार्श्‍वभूमीवर अमोल येडगे यांनी सोमवारी (ता. दोन) सायंकाळी अतिक्रमण हटाव विभाग, वॉर्ड अधिकारी, इमारत निरीक्षकांची बैठक घेतली. त्यात त्यांनी नमूद केले, की शहरात नव्याने सुरू असलेले बांंधकाम महापालिकेच्या परवानगीने सुरू आहे, की बेकायदा पद्धतीने यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी वॉर्ड अधिकारी व संबंधित इमारत निरीक्षकांची आहे, असे असताना जालना रोड सारख्या वर्दळीच्या भागात बेकायदा बांधकाम झाले. त्यातून पुढे मजुराच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे येत्या आठ दिवसांत नव्या बांधकामांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असे आदेश येडगे यांनी दिले. बैठकीला अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे, सर्व वॉर्डअधिकारी, इमारत निरीक्षकांची उपस्थिती होती. ----- नियमितीकरणाची मिळणार संधी एखादे बांधकाम बेकायदा आढळून आल्यास मालमत्ताधारकाला ते नियमित करून घेण्याची सूचना करावी. त्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही, तर बांधकाम पाडून टाकण्यात यावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. बांधकामासाठी महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून परवानगी घेतली किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी शासनाच्या बीपीएमएस ॲपचा वापर इमारत निरीक्षकांना करता येऊ शकतो. त्यानुसार ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.