छत्रपती संभाजीनगर : अवैध सावकारी प्रकरणात न्यू नंदनवन कॉलनीतील चारुशीला इंगळे या महिला सावकाराच्या घरी सहकार विभागाने छापा टाकला होता. यात सावकारीसंदर्भातील दस्तऐवज जप्त केले होते. शिवाय एक कासवही आढळले होते. .वन कायद्यानुसार इंगळेविरुद्ध गुन्हा नोंद झाला, अशी माहिती वन विभागाने दिली. इंगळेच्या घरात सापडलेले कासव हे वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ नुसार महत्त्वाच्या तसेच धोक्यात आलेल्या, कमी संख्या असलेल्या वाइल्ड प्रजातींचा समावेश असलेले आहे. या कायद्यानुसार अशा प्रजातींना कायद्यातील अनुसूची एकमध्ये पूर्णता संरक्षण देण्यात येते..याचाच अर्थ अनुसूची एकचे (शेड्यूल वन) उल्लंघन झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद असून, मानवी धोक्याच्या प्रकरणांशिवाय शिकार करण्यास मनाई असल्याचेही वन विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले..गरज असेल तरच ताब्यात घेणारवन परिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनी सांगितले, ‘‘संबंधित प्रकरणात वन गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद झाला असला तरी गरज असेल तरच महिलेला ताब्यात घेण्यात येईल. कासवाला पुन्हा अधिवासात सोडून देण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे’’, असे त्यांनी सांगितले. हे कासव शेड्यूल वनमध्ये येत असताना वन विभागाकडून संशयिताला अभय का दिले जात आहे, असा सवाल निसर्गप्रेमींकडून उपस्थित होत आहे..Indapur Rescue : इंदापूर येथे बंधक केलेल्या ४१ मजुरांची सुटका; छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर कारवाई.कासवाला मारण्याच्या किंवा शिकारीच्या हेतूने घरात ठेवण्यात आले नाही असे स्पष्ट होत असल्याने इंगळेविरोधात शिकारीचा गुन्हा नोंद केलेला नाही. परंतु, संबंधित कासवाला पाळण्यास प्रतिबंध असूनही पाळल्याने वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम २, कलम ३९, कलम ४८ (ए) या कलमानुसार वन गुन्हा नोंद केला.- आशा चव्हाण, सहायक वनसंरक्षक, प्रादेशिक वन विभाग..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.