
छत्रपती संभाजीनगर : अवैध सावकार चारुशीला इंगळे यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर तिथे कासव आढळले. वनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या सूचनेनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांच्यासह त्यांच्या पथकाने कासव ताब्यात घेतले. ते पशुसंवर्धन दवाखान्यात दाखल केल्याचे कुटे यांनी सांगितले.