LTR17HTP05.jpg लातूर ः रेणापूर तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे पोलिसांनी हातभट्टीची दारू जप्त केली. यावेळी परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक राहुल केंगले, सुधाकर देडे, रवींद्र शिंदे, शिवराज अनंतवाड, विश्वास जाधव, दत्तात्रेय गिरी.
---
हातभट्टीविरोधात कारवाई, ५ गुन्हे; १ लाखावर मुद्देमाल जप्त
--
लातूर, ता. १७ ः अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात रेणापूर पोलिसांनी धडक मोहीम राबवत एकाच दिवशी ५ स्वतंत्र गुन्हे दाखल केले. परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी राहुल केंगले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हजारो लिटर गूळमिश्रित रसायन व हातभट्टी निर्मितीचे साहित्य नष्ट करण्यात आले.
रेणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसंतनगर तांडा परिसरात बुधवारी (ता. १६) अवैध हातभट्टी दारू निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक केंगले यांनी कारवाईचे नेतृत्व करत पथकाला आवश्यक सूचना दिल्या. यात हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे हजारो लिटर गूळमिश्रित रसायन, निकृष्ट दर्जाचा गूळ, प्लॅस्टिकच्या टाक्या, घागरी, लोखंडी भाते व इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला. तसेच अवैध दारू निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या हातभट्ट्या घटनास्थळीच उद्ध्वस्त करण्यात आल्या. रसायन व कच्चा माल पंचांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.
या कारवाईत संबंधित प्रकारांबाबत ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, पोलिस अमलदार शिवराज अनंतवाड, विश्वास जाधव, दत्तात्रेय गिरी यांनी पुढाकार घेतला.