औरंगाबाद : अवैध वाळू उपसा; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हा दाखल : वीरभद्र नदीतून उत्खनन करणाऱ्या पाच ट्रॅक्टर, जेसीबीवर पाचोड पोलिसांची कारवाई
पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व जेसीबी जप्त केले.
पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व जेसीबी जप्त केले.Sakal

पाचोड - नांदर (ता. पैठण) येथील वीरभद्र नदीतून जेसीबीने अवैधरीत्या वाळू उत्खनन करून पाच ट्रॅक्टरद्वारे चोरटी वाहतूक करताना पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून ३५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (ता. २६) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास करण्यात आली. पाचोड पोलिसांनीही अवैध धंदे चालकाविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी (ता.२६) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पाचोड पोलिसांना नांदर येथील वीरभद्र नदीच्या पात्रातून जेसीबी व ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पाचोड ठाण्याचे सपोनि. गणेश सुरवसे सहकाऱ्यांसमवेत नांदर येथील वीरभद्र नदीपात्रात पोहोचले. त्यावेळी एका जेसीबीने वाळू उत्खनन करून पाच ट्रॅक्टरमध्ये वाळू भरताना दिसून आले.

यावेळी पोलिसांनी दोन पंचानासोबत घेऊन ''त्या'' जेसीबी व ट्रॅक्टरचालकांना रॉयल्टी संबंधी विचारणा केली असता त्यांच्याकडे रॉयल्टी व कोणताही वाळू उपशाचा परवाना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे (क्र. एम.एच-२० सी.एच-८२९६, एमएच-२० सी.आर-४०५८, एम.एच-२३ टी-१२२९, एमएच-२० सी-२४१७, एम.एच-२० ई ई-७४९७ या पाच ट्रॅक्टरसह जेसीबी )क्र.एम.एच-२० ई एस-१४२७) व त्यात भरलेली प्रत्येकी एक ब्रास वाळू जप्त असा एकूण ३५ लाख ५५ हजार रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक- मालक विलास उत्तम जाधव (वय २४), जर्नाधन हरिभाऊ शिंदे (वय ३०), महेश कल्याण जगताप (वय २६), अण्णासाहेब शेषराव आरगडे (वय ४०), प्रकाश लक्ष्मण भवर (वय ३२) हे सर्व (रा. दावरवाडी (ता.पैठण), आकाश अनिल काळे (वय ३२) रा.चौढाळा (ता.पैठण) यांच्यावर गौण खनिज उत्खनन अधिनियम व चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक पवन चव्हाण यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुरेश माळी, पोलिस नाईक प्रशांत नांदवे, पवन चव्हाण, विलास काकडे, रवींद्र आंबेकर आदी करीत आहेत. एकंदरीत दोन दिवसांपासून पोलिस करीत असलेल्या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे चालकांत खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com