Illegal Sand Transport : अवैध वाळू वाहतूक; हायवा जप्त
Sand Smuggling : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त करण्यात आला. उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड यांनी ही कारवाई केली असून दंडात्मक कारवाई होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : वाळू उपसा करून अवैधपणे वाहतूक करणारा हायवा ट्रक वाळूज येथे जप्त करण्यात आला. या ट्रकवर दंडाची कारवाई केली जाणार आहे. तर, ट्रक जप्तीची ही कारवाई वैजापूरचे उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड यांनी केली.