Cow Protection : नारायणपूर (ता. गंगापूर) येथील एका जुनाट वाड्यात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर वाळूज पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी गायीचे मांस जप्त केले असून, १३ जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
वाळूज : वाळूज पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नारायणपूर (ता. गंगापूर) येथे अवैध कत्तलखाना आढळून आला. कत्तलखान्याचे कुलूप तोडून आत गेल्यावर पोलिसांना नुकत्याच कत्तल केलेल्या गायीचे मांस दिसले.