इम्तियाज जलील
इम्तियाज जलील

'पीएम केअर्स'मधून मिळाले नकली व्हेंटिलेटर्स, इम्तियाज जलीलांचा आरोप

जिल्ह्यात सध्या ४११ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. मात्र हे काम करणारे आहे का हाच मोठा प्रश्‍न आहे.

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडातून (PM Cares Fund) घाटी रुग्णालयास (Ghati) १५० व्हेंटीलेटर देण्यात आले आहे. मात्र हे काहीच कामाचे नाही, ते फेकुन देण्याचे कामाचे आहेत. त्यांचा वापरच आपण करु शकत नाही. यामुळे ते खासगी रुग्णालयास देण्यात आले आहेत. तेथेही त्याचा वापर होत नाही. यामुळे पंतप्रधानाकडून देण्यात आलेले हे व्हेंटीलेटर (Ventilator) हे नकली असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी सोमवारी (ता.दहा) केला. जिल्हाधिकारी कार्यालयात (Aurangabad Collector Office) सोमवारी लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. (Imtiaz Jaleel Allegation Over Fake Ventilators Received To Ghati Through PM Cares Fund)

इम्तियाज जलील
लसीकरण केंद्रात दिलेल्या मोबाईल नंबरचा कसा होतोय दुरूपयोग? शिरसाटांनी विचारला जाब

या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते. खासदार जलील म्हणाले की, आजच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यात जिल्ह्यात सध्या ४११ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. मात्र हे काम करणारे आहे का हाच मोठा प्रश्‍न आहे. केंद्र सरकारने घाटीला १५० व्हेंटिलेटर दिले. मात्र ते काहीच कामाचे नाही. त्याचा वापरच करू शकत नाही. एवढेच नव्हे तर ते खासगी रुग्णालयास देण्यात आले. खासगी रुग्णालयही त्याचा वापर करु शकत नाहीत. ते नकील व्हेंटीलेटर आहेत. याचा उपयोगच होत नाही. या व्हेंटिलेटर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दुसरा मुद्दा म्हणजे काही रुग्णालये अव्वाच्या-सव्वा बिले आकारत आहेत. काहीचे नावेही जाहीर करण्यात आली. त्या रुग्णालयांतर्फे ९ लाखांचे बिले काढण्यात आले आहेत. यात गजानन हॉस्पिटलाचा समावेश आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, असेही श्री.जलील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com