'एमआयएम'चा पहिला महापौर औरंगाबादमधून, इम्तियाज जलीलांना विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इम्तियाज जलील

पक्षाला शहरवासीयांनी भरभरुन दिले आहे. आमच्यावर जातीयवादी म्हणून टीका झाली. पण आम्ही सर्वधर्मियांची कामे करुन ती खोडून टाकली.

'एमआयएम'चा पहिला महापौर औरंगाबादमधून, इम्तियाज जलीलांना विश्वास

औरंगाबाद : 'एमआयएम'चा AMIM राज्यातील Maharashtra पहिला महापौर औरंगाबादमधून Aurangabad होईल, असा विश्वास खासदार इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांनी विश्वास व्यक्त केला. येथील आरेफ काॅलनीतील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एमआयएमकडून विकासकामांच्या उद्घाटनाचा धडका लावला आहे. श्री.जलील म्हणाले, की एमआयएमने महापालिका निवडणुकीत Aurangabad Municipal Corporation Election पहिल्याच वेळेस पक्षाचे २६ नगरसेवक निवडून आणले. नंतर एक आमदार आणि आता राज्यातील एकमेव खासदार निवडून दिला आहे. पक्षाला शहरवासीयांनी भरभरुन दिले आहे. आमच्यावर जातीयवादी म्हणून टीका झाली. पण आम्ही सर्वधर्मियांची कामे करुन ती खोडून टाकली, असल्याचे श्री.जलील यांनी सांगितले. त्यामुळे मुस्लिमांबरोबरच दलित व हिंदू समाजाने लोकसभा निवडणुकीत एमआयएमला मतदान केले व महाराष्ट्रातील पक्षाचा एकमेव खासदार म्हणून निवडून येण्याचा मान मला मिळाला असल्याचे ते म्हणाले.imtiaz jaleel confidence next mayor of aurangabad from mim

आमदार आणि महापालिकेत २६ नगरसेवक निवडून देऊन एक मजबुत विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी एमआयएमला मिळाली. पक्षाचे काम विरोधकांना खुपायला लागल्याने त्यांनी आम्हाला संपवण्याची भाषा करित असल्याचा आरोप श्री.जलील यांनी केला.

टॅग्स :Imtiaz Jaleel