esakal | योगी, ठाकूर यांनाही जाब विचारावा 
sakal

बोलून बातमी शोधा

योगी, ठाकूर यांनाही जाब विचारावा 

इम्तियाज जलील म्हणाले, ‘‘आठवडाभरापूर्वीचे हे विधान मीडियाने शोधून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. देशातील जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या, समाजा-समाजांमध्ये फूट पाडणाऱ्या कुठल्याही वक्तव्याचे एमआयएम किंवा या पक्षाचा कुठलाही नेता समर्थन करीत नाही. पठाण यांनीही केलेले विधान हे त्या भावनेतून केले नव्हते, हे त्यांनी मुंबईत स्पष्ट केले आहे. 

योगी, ठाकूर यांनाही जाब विचारावा 

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : आठवडाभरापूर्वी झालेल्या सभेतील वारीस पठाण यांचे विधान वेगळ्या पद्धतीने मीडियाने सादर करणे, त्यावरून गदारोळ करणे योग्य नाही. पठाण यांच्या विधानाचे एमआयएम समर्थन अजिबात करीत नाही; पण त्यांच्या विधानावरून आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी किंवा माफी मागायला सांगणाऱ्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीत केलेल्या ‘देश के गद्दारो को गोली मारो सालो’ आणि योगी आदित्यनाथ यांनाही जाब विचारावा, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - काय दिले तनवाणींनी भाजपला आव्हान वाचा...

एनआरसी व सीसीए विरोधातील जाहीर सभेत बोलताना पठाण यांनी वादग्रस्त विधान केले होते. यावरून आता राज्यभरातून एमआयएमवर टीकेची झोड उठली जात आहे. यासंदर्भात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (ता. २०) औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले.

हेही वाचा - महाशिवरात्रीला कोणत्या राशीनुसार कोणते फूल, द्रव्य वाहावे, जाणून घ्या...

इम्तियाज जलील म्हणाले, ‘‘आठवडाभरापूर्वीचे हे विधान मीडियाने शोधून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. देशातील जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या, समाजा-समाजांमध्ये फूट पाडणाऱ्या कुठल्याही वक्तव्याचे एमआयएम किंवा या पक्षाचा कुठलाही नेता समर्थन करीत नाही. पठाण यांनीही केलेले विधान हे त्या भावनेतून केले नव्हते, हे त्यांनी मुंबईत स्पष्ट केले आहे.

एनआरसी, सीसीएच्या विरोधात देशात दोन महिन्यांपासून आंदोलने, निदर्शने सुरू आहेत; मात्र सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय; पण देशातील नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे.

हेही वाचा - कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर मराठवाड्यात धरणांची गरज : राजेश टोपे

सरकार दखल घेत नसेल तर रागाच्या भरात एखादे चुकीचे विधान निघू शकते. आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी वेळोवेळी पक्षातील नेत्यांना याबाबत ताकीद दिलेली आहे. पठाण यांनी स्वतः हे विधान करण्यामागे त्यांचा हेतू वाईट नव्हता, असे स्पष्ट केले आहे. 

 

loading image