विविध समाजातील नागरिक एकोप्याने राहतात, ही देशाची परंपरा - जलील

खासदार इम्तियाज जलील
खासदार इम्तियाज जलील
Updated on

आडूळ (जि.औरंगाबाद) : ग्रामीण भागातील विविध समाजातील नागरिक एकोप्याने राहात असून येथील ग्रामस्थ एकमेकांच्या सुख-दुःखात हिरीरीने सहभागी होतात. ही या देशाची परंपरा आहे. मात्र सांगताना दुःख होते कि, असे दृश्य शहरात कमी होताना दिसत आहे, असे औरंगाबादचे (Aurangabad) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आडुळ (ता.पैठण) (Paithan) येथे सांगितले. येथील औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ-रजापूर शिवारातील नवीन मशिदीच्या बांधकामाचे भूमिपूजन सोमवारी (ता.३०) जलील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. श्री. जलील म्हणाले कि, नागरिकांनी मंदिर-मशिद असा भेदभाव न करता धार्मिक कामांना सढळ हाताने मदत करावी.

खासदार इम्तियाज जलील
तुळजाभवानी मंदिरासमोर काळी गुढी उभारुन शंखनाद आंदोलन

यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे, हजरत मौलाना मौईझोद्दीन फारुखी, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे,पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, नवगावचे उपसरपंच डॉ शरिफ पठाण, मुफ्ती मोहसीन कास्मी, मौलाना रसूल, हाफिज अख्तर, मौलाना मोईन कास्मी, गुलफाम पटेल, आडूळच्या सरपंच शेख शमीम नासेर, माजी सरपंच हाजी मुक्तार मौलाना, शेख जाहेर, सोपान थोरे, शेख नासेर,माजी उपसरपंच महादेव भिसे, मुन्शी पटेल, समीर बिल्डर, प्रभाकर लेंडे, शेख जाबेर, रामकिसन थोरे, कामगार नेते हारूण पठाण, रुस्तुमराव बनकर, हाजी शेरूभाई पठाण, रमेश गोर्डे, इसाक टेलर, शेख हसमोद्दीन, आनंद कासलीवाल, शेख अजिम, शामद सय्यद आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आडूळ येथील मौलाना शब्बीर अहेमद कास्मी यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची रजापूर शिवारातील गट नं ४५ मधील जागा मशिदीसाठी दान दिली आहे.

प्रत्येक व्यक्तिला माहिती द्यावी

मुस्लिम समाज बांधवांनी नुकताच मशिद परिचय हा कार्यक्रम सुरु केला असुन यात इतर समाज बांधवांना मशिदीबाबत संपूर्ण माहिती दिली जाते. त्यामुळे हिंदु समाज बांधवांना मशिदीमध्ये दिवसाच्या पाच वेळेस काय केले जाते. याची माहिती होईल. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांनी आपापल्या गावातील प्रत्येक व्यक्तीला मशिदीमध्ये नेऊन माहिती द्यावी, असे खासदार जलील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kunbi certificate latest update Maharashtra
New Harsul Development
Children, Smartphones and Mental Health: Why Parents Need to Take Mobile Addiction Seriously
Chandgude Family Tragedy
Marathi News Esakal
www.esakal.com