Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleelesakal

इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन, गृहविभाग लक्ष देत नसल्याचा आरोप

गृहविभाग लक्ष देत नसल्याचा आरोप
Published on

औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन येत आहे. याबाबत स्वतः जलील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. यात एक राणे समर्थक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याकडे महाराष्ट्रातील गृहविभाग लक्ष देत नसल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीवर गेल्यामुळे फोनवरुन धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. (Imtiaz Jaleel Say, Threaten Calls Come, But State Home Department Ignore It)

Imtiaz Jaleel
...डोक्यावर हंड्याने हाणतील, इम्तियाज जलील यांची फडणवीसांवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना वेळ आल्यावर उत्तर देऊ असा इशारा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिल्यावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप, मनसे यांच्यासह इतरांनी ओवैसींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यातच जलील यांना धमक्यांचे फोन येत आहे.

Imtiaz Jaleel
Osmanabad Accident| कार पलटी; एकाचा जागेवरच मृत्यू, पाच जण जखमी

आज त्यांनी औरंगाबादमधील (Aurangabad) पाणीप्रश्न, नामांतर यावरुन फडणवीस व ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. निवडणुकाजवळ आल्या की पाण्यावरुन राजकारण केले जात असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com