

औरंगाबाद: दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी देशातील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. भाजप सरकारच्या विरोधात तिसऱ्या आघाडीची चर्चा आहे. परंतु, मुस्लिमांशिवाय तिसऱ्या आघाडीचा विचारच होऊ शकत नाही. देशातील मुस्लीम समाज आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या मागे नाही, तर एमआयएमच्या पाठीशी उभा आहे. तेव्हा बघूयात पुढे काय होते ते, असे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी (ता.२३) पत्रकार परिषदेत सांगितले.
उड्डाणपूल उभारावेत-
नॅशनल हायवे ऑफ ॲथॉरिटीच्यावतीने चिकलठाणा विमानतळासमोर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला एमआयएमने विरोध दर्शवला आहे. या ठिकाणी पुलाची गरज नसून त्याऐवजी वाहतूक कोंडी होणाऱ्या आकाशवाणी किंवा अमरप्रीत चौकात उड्डाणपूल उभारावा, या संदर्भात आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून औरंगाबाद शहरात ७० कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. परंतु नागरिक किंवा लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता चुकीच्या ठिकाणी ते उभारले जात असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.
मुंबई, पुणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठ्या लांबीचे उड्डाणपूल उभारण्यात आले. औरंगाबादेत मात्र तुकड्या तुकड्यात छोटे पूल बांधण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तसाच आहे. तसेच जालना रोडवर वक्फ बोर्डाच्या जागेवर गाळे बांधून ते बेकायदेशीरपणे विकणाऱ्या रजिस्ट्री ऑफिसमधील अधिकारी, कर्मचारी व मोठे व्यापारी, बिल्डर यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही इम्तियाज जलील यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.