Bidhkin Crime : चाकुचा धाक दाखवुन मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्यांना बिडकीन पोलीसांनी केले 24 तासात जेरबंद

Bidhkin Police Arrests Robbery Suspects : बिडकीन पोलिसांनी चाकुचा धाक दाखवून मारहाण करून मोबाईल आणि पैसे लुटणाऱ्या तीन आरोपींना २४ तासांत पकडले. आरोपींनी १५,०००/- रु. चा मोबाईल आणि ७,२८२/- रु. मोबाईल हॅन्डसेटमध्येून चोरले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.
Bidhkin Police Arrests Robbery Suspects

Bidhkin Police Arrests Robbery Suspects

esakal

Updated on

बिडकीन : येथील पोलिस ठाणे बिडकीन येथे दिनांक 11/02/2026 रोजी पो. ठाणे बिडकीन येथे फिर्यादी नामे अविनाश लहु राठोड, वय 27 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. राक्षस भुवन, गईबीनगर तांडा, ता. गेवराई, जि. बीड., ह.मु. जयहिंद कॉलनी, रुम न. 03, साईजीत रो हाऊस, सिडको, नाशिक यांनी फिर्याद दिली की, दिनांक 10/02/2026 रोजीचे रात्री 21.30 ते 21.45 वाजे दरम्यान चितेगांव येथे फिर्यादी हे लघवीसाठी थांबले असता त्यांचे पाठीमागुन तीन अनोळखी इसमांनी स्प्लेंडर मोटार सायकल वर येऊन फिर्यादीच्या पोटाला चाकु लावुन व कॉलर पकडून त्यास अजंठा फार्मा कंपनीच्या पाठीमागे सहान जागेत नेऊन चापट बुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादीचा 15,000/- रु.कि.चा मोबाईल हॅन्डसेट बळजबरीने हिसकावुन घेऊन तसेच मोबाईल हॅन्डसेट मधील फोन पे चा पासवर्ड बळजबरीने घेऊन फिर्यादीच्या फोन पे मधील 7.282/-रुपये काढुन घेतले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरुन पो. ठणे बिडकीन येथे गु.र.नं. 91/2026 कलम 309 (6), 3 (5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सपोनि निलेश शेळके सो. यांचे आदेशाने पुढील तपास पोउपनि मनोज पाटील यांचेकडे दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com