esakal | मराठवाड्यात १५८ जणांचा मृत्यू; दिवसभरात वाढले सात हजार ४६८ कोरोनाबाधित

बोलून बातमी शोधा

Corona

मराठवाड्यात १५८ जणांचा मृत्यू; दिवसभरात वाढले सात हजार ४६८ कोरोनाबाधित

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात बुधवारी (ता. २१) कोरोनामुळे १५८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात औरंगाबादेत ३४, लातूर २८, नांदेड २५, उस्मानाबाद २३, परभणी २१, जालना १७, बीड-हिंगोलीत प्रत्येकी पाच जणांचा समावेश आहे. दिवसभरात सात हजार ४६८ कोरोनाबाधित आढळले.

जिल्हानिहाय वाढलेले रुग्ण असे : लातूर १६६८, नांदेड १३७२, औरंगाबाद १२०७, बीड १०४७, जालना ७९६, उस्मानाबाद ६६७, परभणी ५१२, हिंगोली १९९.

घाटी रुग्णालयात चोवीस तासांत २० जणांचा मृत्यू झाला. त्यात आनंदनगरातील १७ वर्षीय मुलगा, पिशोरमधील ६० वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, काबरानगरातील ३८ वर्षीय पुरुष, सिल्लोडमधील ६४ वर्षीय महिला, मुकुंदवाडीतील ६० वर्षीय महिला, सोयगावातील ५५ वर्षीय पुरुष, रोटेगावातील ७५ वर्षीय पुरुष, फुलेनगर हर्सूल येथील ६८ वर्षीय महिला, दिगाव (ता. सिल्लोड) येथील ३८ वर्षीय महिला, बजाजनगरातील ४२ वर्षीय महिला, मकरणपूर कन्नड येथील ५० वर्षीय पुरुष, भिवगाव येथील ४५ वर्षीय पुरुष, नरहरी रांजणगाव पैठण येथील ६६ वर्षीय महिला, डोनगाव टेकडीतांडा येथील ३४ वर्षीय पुरुष, पिपंळवाडी, पैठण येथील ४२ वर्षीय पुरुष, धावणी मोहोल्ला भागातील ८२ वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ४९ वर्षीय पुरुष, फारोळ येथील ५१ वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

पैठण रोड येथील ८० वर्षीय पुरुष, मिलिंदनगर सिडको एन-पाच येथील ६६ वर्षीय पुरुष, कांचनवाडी येथील ६२ वर्षीय महिला, मारुतीनगर, मयूरपार्क येथील ५१ वर्षीय पुरुष, सिडको एन-दोन येथील ८० वर्षीय महिला, बन्सीलालनगर येथील ५६ वर्षीय पुरुष, गजानननगर येथील ६७ वर्षीय पुरुष, केकतजळगाव (ता. पैठण) येथील ८१ वर्षीय पुरुष, नोदलगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, सराफा सिल्लोड येथील ८० वर्षीय पुरुष, चाराठा येथील ५० वर्षीय महिला, पुरुष शिवगड तांडा, आडगाव बुद्रुक येथील ५९ वर्षीय पुरुष, नाचनवेल येथील ७० वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात तर जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. बरे झालेल्या १२४२ जणांचा औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १२०७ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील ५८४ तर ग्रामीण भागातील ६२३ जणांचा समावेश आहे.

रुग्णसंख्या एक लाख १३ हजार ३७ वर पोचली आहे. बरे झालेल्या आणखी १२४२ जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ९५ हजार ७६५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दोन हजार २५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये मुलाचाही समावेश

कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी होत असताना मृतांचा आकडा काळजी वाढविणारा ठरत आहे. औरंगाबादेत कोरोनामुळे तीन दिवसांपूर्वी 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. आज १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.