Sambhaji Nagar News :" ‘वेल्ड टेक फेअर’चे आज मंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन

प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (सीएमआयए) मराठवाडा ऑटो क्लस्टर, मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (मसिआ) तसेच औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशन (आयसा) च्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या ‘वेल्ड टेक फेअर-२०२३’ हे दोन दिवसीय प्रदर्शन घेण्यात येणार आहे. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२२) उद्‍घाटन होईल.

नानासाहेब भोगले सभागृह मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. यात वेल्डिंग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी तसेच छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग विश्वाला प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाअंतर्गत सुमारे १२ विविध उद्योग समूहांनी आपली उपकरणे तसेच तंत्रज्ञान प्रदर्शनासाठी ठेवले आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Sambhaji Nagar : उपचार सोडून वृद्धेची दागिने शोधासाठी पायपीट

हे प्रदर्शन २२ व २३ डिसेंबरदरम्यान सकाळी साडेदहा ते सायंकाळी सातपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनादरम्यान वेल्डिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील. शनिवारी (ता.२३) सकाळी अकरा वाजता इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग अँड टेस्टिंग टेक्नॉलॉजीचे मार्गदर्शक तसेच व्यवस्थापकीय संचालक सतीश सावंत यांचे व्याख्यान होईल. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मराठवाडा ऑटो क्लस्टरचे अध्यक्ष मुनीश शर्मा यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com