Chh. Sambhajinagar : अपूर्ण कामामुळे बस नादुरुस्त, प्रवाशांची गैरसोय
Incomplete Road Work : छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे माणिकनगर येथे कन्नड आगाराची बस नादुरुस्त झाली. या घटनेत ६६ प्रवाशांमध्ये दोन विदेशी पर्यटक दांपत्याला देखील फटका बसला.
माणिकनगर : छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गाचे अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे कन्नड आगाराची बस माणिकनगर सिल्लोड येथे गुरुवारी नादुरुस्त झाली. त्यामुळे बसमधील ६६ प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यामध्ये दोन वयोवृद्ध विदेशी पर्यटक दांपत्याला याचा फटका बसला.