विमानांची संख्या वाढवा, अन्यथा विमानतळांचा उपयोग काय?

विमानांची संख्या वाढवा, अन्यथा विमानतळांचा उपयोग काय?
Published on: 
विमानांची संख्या वाढवा, अन्यथा विमानतळांचा उपयोग काय? एथर एनर्जीचे सहसंस्थापक तरुण मेहतांची टिप्पणी; छत्रपती संभाजीनगरचे दिले उदाहरण सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १४ : शहरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होत असताना हवाई वाहतुकीच्या मर्यादित सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विमानतळांची संख्या वाढविण्याबरोबरच देशातील विमानांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे. छत्रपती संभाजीनगरसारख्या औद्योगिक शहरात अधिक विमानफेऱ्यांसाठी स्थानिक उद्योग संघटनांना विमान कंपन्यांकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो, असे मत एथर एनर्जीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण मेहता यांनी ‘एक्स’वर व्यक्त केले. भारतीय हवाई वाहतुकीतील विमानांची संख्या अमेरिकेच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याकडे लक्ष वेधताना मेहता यांनी देशात विमानांची संख्या वाढविण्याची गरज अधोरेखित केली. विमानतळांची संख्या आणि विमानांची संख्या जवळपास समान होण्याइतकी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ही विमानतळांची संख्या जास्त असल्याची टीका नसून देशाला आणखी विमानतळांची आणि त्याहून अधिक विमानांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संभाजीनगरचे उदाहरण देत मांडली अडचण छत्रपती संभाजीनगरचे उदाहरण देताना मेहता यांनी लिहिले, की शहरात एथर एनर्जीच्या नव्या प्रकल्पासह अनेक उद्योग उभे राहत आहेत. त्यामुळे व्यावसायिक प्रवासाची मागणी वाढत आहे. मात्र, अधिक विमानफेऱ्या सुरू करण्यासाठी स्थानिक उद्योग संघटनांना इंडिगो विमान कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. अपेक्षित विमानसेवा उपलब्ध नसल्यास काही वेळा नाशिकसारख्या जवळच्या शहरातून प्रवासासाठी वाहनाने जाण्याचा पर्याय निवडावा लागतो. औद्योगिकदृष्ट्या विस्तारत असलेल्या शहरासाठी ही परिस्थिती योग्य नाही, असे त्यांनी सूचित केले. --------- औद्योगिक विकासासोबत जुळवा विस्तार समाजमाध्यमांवरील चर्चेत ‘एक्स’वरील सक्रिय उद्योजक आणि तज्ज्ञांनी देशांतर्गत प्रवासाची वाढती मागणी, औद्योगिक विस्तार आणि व्यावसायिक प्रवासाच्या गरजा लक्षात घेता विमानांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे म्हटले. विमानतळ उभारल्यानंतर तेथून पुरेशा विमानफेऱ्या सुरू झाल्या, तरच त्या पायाभूत सुविधांचा अपेक्षित उपयोग होईल. छत्रपती संभाजीनगरच्या उदाहरणातून औद्योगिक विकासाच्या वेगाशी हवाई वाहतूक सुविधांचा विस्तार जुळविण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.