औरंगाबाद : कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाने विद्यापीठ चौथ्या दिवशीही ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाने विद्यापीठ चौथ्या दिवशीही ठप्प

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी १०० टक्के सहभाग नोंदविला, त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले आहे.

औरंगाबाद : कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाने विद्यापीठ चौथ्या दिवशीही ठप्प

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने आक्रमक पवित्रा घेऊन मंगळवारी (ता. २१) चौथ्या दिवशीही विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप कायम ठेवला आहे.शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघाने बेमुदत संपाला १८ डिसेंबरपासून सुरुवात केली आहे. परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारचा सकारत्मक निर्णय घेण्यात न आल्यामुळे आज चौथ्या दिवशी संप कायम ठेवला आहे. कर्मचारी नेते डॉ. कैलास पाथ्रीकर म्हणाले, जोपर्यंत शासनाकडून कोणतेही लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा संप कायम राहील. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी १०० टक्के सहभाग नोंदविला. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पर्वत कासुरे, कर्मचारी नेते डॉ. कैलास पाथ्रीकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपात दिलीप भरड, प्रकाश आकडे, डॉ. गणेश मंझा, संजय कवडे, रवींद्र काळे, भालचंद्र ढगे, मनोज शेटे, विजय दरबस्तवार, अनिल खांमगावकर, दिनकर जगदाळे, नितीन शिंदे, एन. डी. पवार, सुनीता अंकुश, शुभांगी बिन्नीवाले, अर्जुन खांड्रे, भगवान फड, इंदल जाधव, रवी साळुंखे, नितीन गायके, सचिन रापते, पी. व्ही. शिंदे, शकील रामपुरे, पंडित साळुंके, अशोक लग्गड, किशोर उबाळे, हरिश्चद्र साठे, गजानन पालकर आदींनी बेमुदत संपात सहभाग नोंदविला.

टॅग्स :Aurangabad News