Indian Grey Hornbill : ‘इंडियन ग्रे हॉर्नबिल’ संभाजीनगरचा पक्षी

तीन हजार बालमित्रांनी मिळून ‘इंडियन ग्रे हॉर्नबिल’ म्हणजे ‘राखी धनेश’ या पक्षाची छत्रपती संभाजीनगरचा ‘शहर पक्षी’ (सिटी बर्ड) म्हणून निवड केली.
Indian Grey Hornbill
Indian Grey Hornbillsakal

छत्रपती संभाजीनगर: तीन हजार बालमित्रांनी मिळून ‘इंडियन ग्रे हॉर्नबिल’ म्हणजे ‘राखी धनेश’ या पक्षाची छत्रपती संभाजीनगरचा ‘शहर पक्षी’ (सिटी बर्ड) म्हणून निवड केली. सहा शाळांच्या तीन हजार विद्यार्थ्यांनी या पक्षाला ७०० मते देत विजेता केले.

शुक्रवारी ‘सकाळ’ कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि पोलिस उपायुक्त (परिमंडळ -१) नितीन बगाटे यांनी हा निकाल जाहीर केला. यावेळी ‘सकाळ’चे मराठवाडा आवृत्तीचे संपादक संतोष शाळिग्राम, पक्षीतज्ज्ञ व एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन आणि एज्युकेशनल अकादमीचे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी व अकादमीचे लालासाहेब चौधरी, सतीश जोशी, स्वरदा जोशी, विजय न्यायाधीश, श्रवण परळीकर उपस्थित होते.

‘शहराचा पक्षी’ निवडणूक खूप उत्तम पद्धतीने हाताळली गेली. मलाही निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडते. लहानपणी वर्तमानपत्रातील कात्रण कापायची, ती वह्यांना लावायची याची आवड होती. तसेच पक्षी निरीक्षणही करत असे. नोकरीच्या निमित्ताने चंद्रपूर, सिंधुदुर्ग परिसर आणि इथली जैवविविधता पाहिली. त्यावेळी पक्षी दर्शन व्हायचे.

— नितीन बगाटे, पोलिस उपायुक्त

मी ग्रामीण भागातून आलो आहे. लहानपणी चिमणी, कावळे आणि विविध पक्षी पाहिले. शहरात पक्ष्यांचा किलबिलाट कमी वाटतो. शहरातही पक्ष्यांची संख्या वाढली पाहिजे.

— डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com