Higher Education : उच्च शिक्षणासाठी परदेशाकडे ओढा; व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य, सुलभ कर्जाने वाढतेय संख्या
Professional Courses : भारतीय विद्यार्थ्यांची परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संख्या वाढत आहे. २०२४ मध्ये १३.३५ लाख विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत असून, दरवर्षी सुमारे १० टक्के विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये, विशेषत: 'एमएस'साठी विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे.
छत्रपती संभाजीनगर : विदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ष २०२४ मध्ये देशातील १३.३५ लाख विद्यार्थी विदेशात शिक्षण घेत असल्याची माहिती केंद्र शासनाने लोकसभेत दिली.