
फुलंब्री : पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंधरावर्षीय सुलेखन-रेखाटनकार पृथ्वीराज गणेश जाधव (गणोरी, ता. फुलंब्री) याने साकारलेल्या अक्षरवारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वारीदरम्यान गेल्या पाच वर्षांत त्याने तब्बल साडेतीन हजार रेखाटने साकारली आहेत.