विमा दावा नाकारल्यास ग्राहक आयोगात दाद मागता येते

विमा दावा नाकारल्यास ग्राहक आयोगात दाद मागता येते
Published on: 
लीड --- ((ग्राहक हक्क)) --- ऐन संकटात विमा कंपनीने क्लेम नाकारला तर... ------ ग्राहक आयोगातून मिळवा हक्क; भरपाईचा अचूक मार्ग --- स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अनेक जण जीवन विमा, आरोग्य विमा तसेच वाहन विमा घेतात. मात्र, विम्याचा लाभ घेण्याची वेळ येते, तेव्हा काहीवेळा विमा कंपन्या विविध कारणे देऊन दावा नाकारतात किंवा तो प्रलंबित ठेवतात. अशावेळी ग्राहकाला ग्राहक आयोगात दाद मागता येते. ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ अंतर्गत विमा सेवा ही ग्राहकाला पुरवली जाणारी सेवा मानली जाते. त्यामुळे पॉलिसीच्या अटींचा चुकीचा अर्थ लावून दावा नाकारणे, योग्य कारण न देता भरपाई रोखणे किंवा आवश्यक कागदपत्रे सादर करूनही दाव्याचा निर्णय न घेणे, या बाबी परिस्थितीनुसार सेवेतील त्रुटी ठरू शकतात. या अधिनियमाच्या कलम ३५ नुसार संबंधित ग्राहक आयोगात तक्रार दाखल करता येते. कलम ३९ अंतर्गत आयोगाला योग्य दिलासा देण्याचे अधिकार आहेत. प्रकरणातील पुरावे आणि पॉलिसीच्या अटी तपासून आयोग भरपाई देण्यासह योग्य आदेश देऊ शकतो. तक्रार करण्यापूर्वी विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे लेखी दाद मागावी. कंपनीने समाधानकारक उत्तर न दिल्यास भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाच्या (आयआरडीएआय) ‘बीमा भरोसा’ पोर्टलवर तक्रार नोंदवता येते. गरजेनुसार विमा लोकपालाकडेही दाद मागता येते. ग्राहक आयोगात तक्रार करताना विमा पॉलिसी, हप्ता भरल्याचे पुरावे, दावा अर्ज, वैद्यकीय किंवा अपघातासंबंधी कागदपत्रे आणि दावा नाकारल्याचे पत्र जोडणे महत्त्वाचे आहे. सामान्यतः तक्रार कारण निर्माण झाल्यापासून दोन वर्षांच्या आत दाखल करावी. योग्य कारण असल्यास विलंब माफ करण्याची तरतूद आहे. त्यामुळे दावा नाकारला म्हणून ग्राहकाने हार न मानता उपलब्ध कायदेशीर मार्गांचा वापर करावा. - ॲड. अमोल वाघमारे ९०६७१२९२२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.