आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियंत्रक दिन साजरा

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियंत्रक दिन साजरा
Published on: 
---- फोटो ABD26J81858 छत्रपती संभाजीनगर ः विमानतळावर मंगळवारी (ता. २०) ‘आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियंत्रक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विमानतळ संचालक शरद येवले, इंडिगोचे इन्चार्ज अनिरुद्ध पाटील आणि एटीसी इनचार्ज विनायक कटके, प्रिन्स गुप्ता, ओंकार लाभशेटवार, विकास नारायणकर आणि विमानतळावरील इतर अधिकारी व विमान कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. ------ आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियंत्रक दिन साजरा ​छत्रपती संभाजीनगर, ता. २१ : छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मंगळवारी (ता. २०) ‘आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक नियंत्रक दिन’ उत्साहात साजरा केला. विमानांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक २४ तास सुनिश्चित करणाऱ्या हवाई वाहतूक नियंत्रकांच्या (एटीसी) योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला. ​या कार्यक्रमास विमानतळ संचालक शरद येवले, इंडिगोचे इन्चार्ज अनिरुद्ध पाटील आणि एटीसी इन्चार्ज विनायक कटके उपस्थित होते. तसेच प्रिन्स गुप्ता, ओंकार लाभशेटवार, विकास नारायणकर आणि विमानतळावरील इतर अधिकारी व विमान कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. ​१९६१ मध्ये ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स असोसिएशन’ची स्थापना झाली होती; त्या निमित्ताने दरवर्षी २० ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. ​याप्रसंगी शरद येवले यांनी एटीसी पथकाच्या अविरत सतर्कतेचे आणि तांत्रिक कौशल्याचे कौतुक केले. ​इंडिगोचे अनिरुद्ध पाटील यांनी विमानतळावरील सर्व एटीसी अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com