Chhatrapati Sambhajinagar : गेट येऊन पडले; बंधारे मात्र कोरडे ठाक; कोल्हापुरी बंधार्‍यात २० टक्के साठा

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने ५८५ कोल्हापुरी बंधारे बांधले
iron gate 20 percent water storage in Kolhapuri Dam chhatrapati sambhajinagar marathi news
iron gate 20 percent water storage in Kolhapuri Dam chhatrapati sambhajinagar marathi newsSakal

छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट नसल्यामुळे कोट्यवधी लीटर पाणी वाहून जाते आहे. या कोल्हापूर बंधाऱ्यांना गेट बसवण्यासाठी पदाधिकारी व प्रशासनाच्या वतीने वारंवार निधीची मागणी करण्यात येत होती. यात अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर यावर्षी निधी मंजूर झाला. बंधाऱ्यावर गेटही येऊन पडले आहेत. परंतु, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे हे कोरडे ठाक पडले आहेत.

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने ५८५ कोल्हापुरी बंधारे बांधले आहेत. यापैकी बहुतांश बंधाऱ्यांना गेटच नाहीत. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी लिटर पाणी वाहून जाते. कोल्हापुरी बंधाऱ्यांचा गेटचा प्रश्न वर्षानुवर्षे चर्चेत राहिला असून,

या गेटसाठी पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य वारंवार मागणी करत असूनही शासनाच्या वतीने याला निधी मिळत नव्हता. परंतु, वर्ष २०२३ ला शासनाच्या वतीने नऊ तालुक्यांसाठी जवळपास २ हजार ७३० लोखंडी गेट बसविण्यासाठी तीन कोटी ९३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्येक तालुक्याच्या मागणीनुसार गेटचे वितरण करण्यात आले आहे. यातील बहुतांश गेट हे कोल्हापुरी बंधाऱ्यावर येऊन पडले आहेत. परंतु, जिल्ह्यातील सर्व कोल्हापुरी बंधारे हे ८० टक्के कोरडे असून, केवळ दहा ते वीस टक्केच यात पाणीसाठा आहे. त्यामुळे यावर्षी गेट बसूनही त्याचा फायदा होणार नाही. परंतु, या गेटचे जीवनमान २५ वर्ष असल्याकारणाने हे गेट पुढील वर्षासाठी उपयुक्त ठरणार असले तरी यंदा मात्र पाणी अडवता येणार नाही.

मंजूर झालेले लोखंडी गेट

  • छत्रपती संभाजीनगर ः ५१६

  • कन्नड ः ५७५

  • फुलंब्री ः १२४

  • सिल्लोड ः १००८

  • सोयगाव ः २१५

  • वैजापूर व गंगापूर ः २९२

  • एकूण ः २७३०

सिंचन क्षमतेवर परिणाम

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांशी बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा शिल्लक नाही. यातील सिल्लोड आणि सोयगाव हे तालुके सोडले तर इतर सर्व तालुक्यातील कोल्हापुरी बंधारे हे कोरडे टाक आहेत. यामुळे यावर्षी ३ हजार हेक्टर सिंचन क्षमतेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या उपकरातून पैठण व खुलताबादसाठी गेट बसविण्यात आले आहेत.

सर्वत्र गेट येऊन पडले आहेत. परंतु, जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे बहुतांश कोल्हापुरी बंधारे हे कोरडे आहेत. त्यात पाणी नाही. यामुळे या गेटचा यावर्षी फायदा झाला नसला तरी येणाऱ्या पुढील वर्षी सिंचन क्षमता वाढीसाठी या गेटचा फायदा होणार आहे.

- आशिष चौधरी, कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com