इस्कॉन मधुवनमध्ये ४ सप्टेंबरला जन्माष्टमी महोत्सव

इस्कॉन मधुवनमध्ये ४ सप्टेंबरला जन्माष्टमी महोत्सव
Published on
‘इस्कॉन’मध्ये शुक्रवारी जन्माष्टमी महोत्सव -- छत्रपती संभाजीनगर, ता. १ ः श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव शुक्रवारी (ता. चार) आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) अदालत रोड येथील मधुवन केंद्रात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख डॉ. रमेश लड्ढा यांनी मंगळवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत दिली. या निमित्ताने सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भगवान श्रीकृष्णांच्या प्राकट्यावेळी मध्यरात्री भव्य आरती, हरिनाम संकीर्तन आणि आनंदोत्सव होणार असून, भगवानांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. हजारो भाविक सहकुटुंब या सोहळ्यात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भाविकांच्या सुविधेसाठी सुमारे २० हजार चौरस फुटांचा वॉटरप्रूफ मंडप उभारला असून, १५ ते २० हजार भाविकांसाठी व्यवस्था केली आहे. मंदिराची आकर्षक पुष्पसजावट करण्यात येत असून, दर्शन व भाविकांच्या ये- जा व्यवस्थेचे नियोजन केले आहे. इस्कॉनचे विनोद बगडिया यांनी सांगितले की, महोत्सवस्थळी सेल्फी पॉइंट, किड्स कॉर्नर तसेच बालक- बालिकांसाठी श्रीकृष्णलीलांवरील फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेतली जाणार आहे. भारतीय सांस्कृतिक मूल्यांवरील पुस्तके व खाद्यपदार्थांचे स्टॉलही असतील. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. संतोष मद्रेवार म्हणाले, तापडिया-कासलीवाल मैदानाजवळील एबीसी कॉम्प्लेक्स, पत्रकार भवन आणि सतीश मोटर्स परिसरात वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्किंगपासून मधुवनपर्यंत ई-रिक्षा सुविधा उपलब्ध असेल. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागत समितीचे अथर्वेश नंदावत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com