चिकलठाणाच्या राजाच्या दरबारात यंदा जगन्नाथपुरीचे दर्शन!

चिकलठाणाच्या राजाच्या दरबारात यंदा जगन्नाथपुरीचे दर्शन!
Published on
फोटो- चिकलठाण्याचा राजा ABD२६J७९६४७ ABD26J79691 ((((फोटो ओळ))) चिकलठाणा ः येथील श्री सावता गणेश मंडळाने उभारलेला जगन्नाथपुरी मंदिराचा देखावा. -- चिकलठाण्यात यंदा जगन्नाथपुरीचे दर्शन! --- सव्वा एकर परिसरात मंदिराची प्रतिकृती; परंपरा कायम --- सकाळ वृत्तसेवा चिकलठाणा, ता. १८ : दूरवरच्या तीर्थक्षेत्रांना भेट देणे शक्य नसलेल्या भाविकांना शहरातच धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्याचा संकल्प काही गणेश मंडळांनी केला आहे. चिकलठाणा येथील श्री सावता गणेश मंडळाने गणेशोत्सवाची ४३ वर्षांची परंपरा जपली आहे. ‘चिकलठाणाचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाकडून यंदा सव्वा एकर परिसरात जगन्नाथपुरी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात भाविकांना थेट शहरातच जगन्नाथपुरीचे दर्शन घेता येणार आहे. मंडळाची देखाव्यांची परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. सुरवातीच्या काळात मंडळाने ‘समुद्रमंथन’ आणि ‘सीता स्वयंवर’ यासारखे सजीव आणि निर्जीव पौराणिक प्रसंग सादर केले होते. त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काळानुसार बदल स्वीकारत मंडळाने प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या भव्य प्रतिकृती साकारण्यास सुरवात केली. आर्थिक किंवा इतर कारणांमुळे दूरवरच्या तीर्थक्षेत्रांना जाऊ न शकणाऱ्या नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्शनाचा अनुभव मिळावा, हा यामागील मुख्य हेतू आहे. यापूर्वी मंडळाने बालाजी मंदिर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि माता वैष्णोदेवी यासारख्या प्रसिद्ध स्थळांच्या प्रतिकृती यशस्वीपणे साकारल्या आहेत. चारधामांपैकी एक असलेल्या जगन्नाथपुरीचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन यंदा ही प्रतिकृती उभारण्यात येत आहे. सव्वा एकर परिसरातील हा देखावा भाविकांचे मुख्य केंद्रबिंदू ठरेल. यासोबतच गणेशोत्सव काळात महाप्रसाद, रक्तदान शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रमांची परंपराही मंडळाने कायम ठेवली आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य नीलेश कावडे यांनी दिली. -- (((कोट))) श्री सावता गणेश मंडळाच्या या देखाव्यासाठी कारागीर अहोरात्र मेहनत घेत आहेत. दरवर्षी वेगवगेळे देखावे आम्ही साकारतो. यंदा जगन्नाथपुरीचा हा देखावा असणार आहे. -संजीव डोळस, मंडळाचे सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com