((टिप- ही बातमी श्रुती काटे यांनी दिली))
-------------------
ABD२६J८१२९७- तनिष्का लोगो
---
महिलांसाठी उद्या ‘जागर आदिशक्तीचा’
---
दुर्गेच्या नऊ रूपांचे सादरीकरण, जागरण-गोंधळ, उद्योजक मार्गदर्शन
-
छत्रपती संभाजीनगर, ता. १४ : महिलांमधील एकजूट वाढावी, सांस्कृतिक परंपरांचे जतन व्हावे आणि महिला शक्तीचा जागर व्हावा, या उद्देशाने ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या वतीने शुक्रवारी (ता. १६) ‘जागर आदिशक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी ३ वाजता सिडको एन-६ येथील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात होईल.
या कार्यक्रमात दुर्गेच्या नऊ रूपांचे सादरीकरण तसेच पारंपरिक जागरण-गोंधळ होणार आहे. राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या वतीने तुषार डोहीदा हे महिला उद्योजकांना मार्गदर्शन करतील. तसेच तनिष्का व्यासपीठाच्यावतीने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच तनिष्का व्यासपीठाच्यावतीने आयोजित विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन तनिष्का व्यासपीठाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा समन्वयक श्रुती काटे यांनी केले आहे.
------------
प्रत्येक महिलेला १ ग्रॅम गोल्डची भेट!
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेला सोनसखीतर्फे १ ग्रॅम गोल्डची भेट देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांसाठी हा सांस्कृतिक सोहळा आनंदासोबतच खास भेटीची पर्वणी ठरणार आहे.
-----
कार्यक्रमाविषयी...
दिनांक : शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६
वेळ : दुपारी ३ वाजता
स्थळ : कुलस्वामिनी मंगल कार्यालय, सिडको एन-६
अधिक माहितीसाठी संपर्क : श्रुती काटे- ९१३०६३२२२१