Jaggery Tea Craze : वेगळी चव म्हणून तरुणाईला लागली गुळाच्या चहाची ‘गोडी’

शहरात मिटक्या मारत घेतला जातो चहा; वेगळी चव म्हणून वाढली मागणी
jaggery tea craze in youth tea stall business benefits much more
jaggery tea craze in youth tea stall business benefits much moreSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : घराबाहेर पडल्यानंतर मित्रमंडळी एकमेकांना भेटल्यानंतर हमखास एकत्र चहा घेत गप्पागोष्टी होतात. आता तर चहामध्ये अनेक वेगवेगळ्या ब्रँडची चहा दुकाने बाजारपेठेत दिसून येतात. विशेष म्हणजे गुळाचा चहा अशी स्पेशल चहाची दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत. वेगळी चव म्हणून तरुणाईकडून गुळाच्या चहाची मागणी वाढली आहे.

शहरातील प्रत्येक भागात ठिकठिकाणी गुळाच्या चहाचे स्टॉल आता दिसत आहेत. गुळाचा चहा कुठे आठ, तर कुठे दहा रुपयांत मिळतो. गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी ग्रामीण भागात गुळाचा चहा घेतला जायचा. आता तर शहरी भागात मिटक्या मारत गुळाचा चहा घेतला जात आहे.

फायदे

  • पचनासाठी उपयुक्त ः नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अभ्यासात गुळाच्या चहाचे अनेक फायदे सांगितले आहेत. त्यातील एक फायदा हा पचनव्यवस्थेशी संबंधित आहे. गुळाचा चहा पिण्याने अपचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे गुळाच्या चहाने पचनक्रिया सुधारून अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

jaggery tea craze in youth tea stall business benefits much more
Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा
  • पाळीदरम्यान उपयुक्त ः महिलांना मासिक पाळीदरम्यान गुळाचा चहा पिणे उपयुक्त ठरू शकते. गुळात असणाऱ्या पोषक घटकांमुळे व्यक्तीला अशा दिवसांमध्ये आराम मिळू शकतो. जर एखाद्या महिलेचे या काळात पोट दुखत असेल, अस्वस्थ वाटत असेल, तरीही गुळाच्या चहाचा उपयोग केला जाऊ शकतो.

  • वजन कमी करणे ः गुळामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असल्याने चयापचयाची क्रिया सुधारून वजनावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. म्हणजेच वजन कमी करण्यासाठीदेखील गुळाचा चहा उपयोगी ठरू शकतो.

  • डिटॉक्स ः गुळाचा वापर शरीरातील अनावश्यक कचरा बाहेर काढण्यासाठी केला जाऊ शकतो. गूळ हा नैसर्गिकरीत्या श्वसनमार्ग, अन्ननलिका, पोट इत्यादी अवयवांची काळजी घेत असतो. त्यामुळे पोटातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकून देऊन गूळ पोटाचे आणि शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतो.

  • प्रतिकारशक्ती वाढवणे ः गुळामध्ये असणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक घटकांमुळे साहजिकच गूळ आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करू शकतो. म्हणून गुळाचे सेवन केल्याने आपले शरीर लहान-लहान त्रासांपासून आपला बचाव करण्यासाठी सक्षम होण्यास मदत होऊ शकते.

तोटे

  • साखरेचे प्रमाण वाढते ः गुळाच्या अतिसेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. १० ग्रॅम गुळामध्ये जवळपास ९.७ ग्रॅम इतकी साखर असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचं सेवन शक्यतो टाळलेले बरे.

  • अतिगूळ नकोच ः गूळ खाणे ज्याप्रमाणे घातक ठरू शकते, त्याचप्रमाणे खराब दर्जाचा आणि योग्य पद्धतीने तयार न केला गेलेला गूळ खाणेही धोक्याचे ठरते.

  • वजन वाढते ः शंभर ग्रॅम गुळामध्ये जवळपास ३८५ कॅलरीज असतात. त्यामुळे डाएट करणाऱ्यांनी याचे सेवन टाळावे.

  • नाकातून रक्तस्त्राव ः गूळ मुळातच एक गरम पदार्थ आहे. त्यामुळे गरम वातावरणात याचे सेवन केल्यास अनेकदा नाकातून रक्त वाहण्यासही सुरवात होते. पोटातील गरमी वाढल्यामुळे याचे परिणाम त्वचेवरही दिसून येतात.

jaggery tea craze in youth tea stall business benefits much more
Tea Prices: आता चहा पिणेही होणार महाग? भारतीय चहा उद्योग संकटात, काय आहे कारण?

गुळाचा चहा तुमच्या पचनासाठीदेखील उपयुक्त असतो. तुमची पचनशक्ती वाढविण्यास मदत करू शकतो. त्यासोबतच या चहातून मिळणारी ऊब ही तुमच्या शरीरातील थकवा दूर करण्याचेदेखील काम करते. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी त्याचा फायदा होतो.

- डॉ. अल्का कर्णिक, आहारतज्ज्ञ

गुळाचा दर ६० रुपये किलो आहे. एका लिटर दुधामध्ये २० कप चहा तयार होतो. गूळ, दुधाचे दर जास्त असूनही फक्त चहा आठ ते दहा रुपयांत कट विकला जात आहे. गॅस, दुकान भाडे असा सर्वच खर्च असतो. व्यवसाय चांगला होतो, त्यामुळे आम्हाला तो परवडतो.

- अमोल वाझे, चहा विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com