Ancient Shiva Temple: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुक्कामामुळे ऐतिहासिक महत्त्व मिळालेलं जयसिंहपुरा शिवमंदिर
Historic Temple: जयसिंगपुरा येथील जयसिंह शिवमंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा प्रवासातील मुक्कामाशी संबंधित ऐतिहासिक मंदिर आहे. प्राचीन वास्तुशिल्प, बेलाचे अनोखे झाड व महादेवाची तांब्याची पिंड या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
मकई गेटपासून विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला दिसते राजधानी अपार्टमेंट. या अपार्टमेंटच्या जागेवर यापूर्वी पुरातन हवेली होती. ती जयसिंगाची हवेली म्हणून ओळखली जायची. मात्र, ती आता इतिहासजमा झाली आहे.