esakal | कोरोना लसीकरणाचा खेळखंडोबा, लसीचा साठा संपला

बोलून बातमी शोधा

जालन्यात लसीकरण केंद्रावर नागरिकांनी लस  घेण्यासाठी गर्दी केली होती.
कोरोना लसीकरणाचा खेळखंडोबा, लसीचा साठा संपला
sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : मागील काही आठवड्यांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत अल्प होत आहे. त्यामुळे कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत असताना शासन कमी पडत असल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता.२८) जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा पूर्णतः संपला आहे. त्यामुळे जिल्ह्यात २८६ पैकी केवळ २० लसीकरण केंद्रांवर दुपारपर्यंत लसीकरण सुरू होते. परंतु, दुपारनंतर लसीकरण केंद्रावर लस संपल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने घराचा रस्ता धरावा लागला.

हेही वाचा: औरंगाबाद पालिका निवडणूक : शपथपत्र दाखल करण्यास चार आठवड्यांची मुदत

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस नागरिकांनी टोचून घ्यावी. यासाठी मोठी जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक ही कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर रांगा लावत आहेत. मात्र, शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या मागणीच्या तुलनेत अल्पपुरवठा करत आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडून तब्बल २८६ शासकीय कोरोना लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. परंतु, कोरोना प्रतिबंधात्मक लसच उपलब्ध होत नसल्याचे आरोग्य यंत्रणेला कोरोना लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या रोषाला तोंड देण्याची वेळ आली येत आहे. बुधवारी (ता.२८) जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीअभावी तब्बल २६६ लसीकरण केंद्रे बंद होते. तर केवळ २० कोरोना लसीकरण केंद्र दुपारपर्यंत सुरू होते. दुपारनंतर या लसीकरण केंद्रावरील लस संपल्याचे फलक आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लावण्यात आले. त्यामुळे तासन् तास रांगे उभा असलेल्या नागरिकांना तोंड देण्याची वेळ आरोग्य कर्मचाऱ्यांवर आली. दरम्यान जिल्ह्यात प्रत्येक दिवसाला २५ हजारांपेक्षा अधिक लसीकरण करण्यासाठी लागणारी यंत्रणा जिल्हा आरोग्य यंत्रणेने उभा केली आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा त्या पद्धतीने होत नाही. विशेष म्हणजे ता. एक मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार आहे. परंतु, लसीकरणाचा पुरवठा असा संथगतीने सुरू राहिला तर लसीकरण मोहीम ही कागदावर राहील अशी भिती वर्तविण्यात येत आहे.