esakal | दिलासादायक! जालन्यात कोरोना पॉझिटिव्ह रेट ९.९२ टक्के
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना पॉझिटिव्ह.

दिलासादायक! जालन्यात कोरोना पॉझिटिव्ह रेट ९.९२ टक्के

sakal_logo
By
उमेश वाघमारे : सकाळ वृत्तसेवा

जालना: जिल्ह्यातील मागील दीड ते दोन महिन्यांपासून कोरोना रूग्ण संख्येचा आलेख खाली जात असल्याचे सुखद चित्र आहे. त्यामुळे दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी आला तरी जिल्ह्याचा प्रोग्रेसिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रेट आज ९.९२ टक्के आहे. त्यामुळे अजून ही कोरोना संपला नसल्याचे चित्र असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालनकरून स्वतःला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

हेही वाचा: परळीत वैद्यनाथ अर्बन बँकचा अधिकारी ताब्यात

सध्या सर्वत्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. तिसऱ्या लाट रोखण्यासाठी शासनासह प्रशासनाकडून पूर्व तयारी ही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अद्यापि कोरोनाची दुसऱ्या लाट पूर्णतः ओसरली नसल्याचे चित्र आहे. मात्र, कोरोना रूग्ण संख्या कमी झाल्याचे सुखद चित्र आहे. त्यामुळे दैनंदिन कोरोना रूग्ण संख्या कमी झाल्याने दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रेट ही ०.२२ टक्क्यांवर आला आहे.

मात्र, जिल्ह्याचा प्रोग्रेसिव्ह पॉझिटिव्ह रेट ९.९२ टक्के असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजून ही कोरोनाचा धोका टाळला नसल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या केवळ नऊ सक्रिय कोरोना रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल्यास कोरोना पसार रोखण्यासह स्वतःची कोरोनापासून सुरक्षा ही होईल.

हेही वाचा: Aurangabad:परिचारिकांच्या बदल्यांना स्थगिती

मृत्यू दर १.९३ टक्के

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एक हजार १८९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यू दर हा १.९३ टक्के इतका असल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे.

रिकव्हरी रेट ९८.०६ टक्के

जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६१ हजार ७०४ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. या कोरोना रूग्णांवर डॉक्टर, परिचारिका यांनी परिश्रम घेऊन तब्बल ६० हजार ५०६ कोरोना रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट हा तब्बल ९८.०६ टक्के असल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे.

loading image
go to top