esakal | Maratha Reservation: पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन सुरु

बोलून बातमी शोधा

null

Maratha Reservation: पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन सुरु

sakal_logo
By
वसंत काळवणे

रोहिलागड (जि.जालना) : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण कायदा (Maratha Reservation) अवैध ठरवत रद्द केला आहे. याबाबत आज बुधवारी न्यायालयाने निर्णय दिला. या निर्णयाविरोधात जालना जिल्ह्यातील किनगावात (ता.अंबड) (Ambad) पाण्याच्या टाकीवर चढुन शोले स्टाईल आंदोलन करण्यात येत आहे. यात शिवसंग्रामचे (Shivsangram) जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले, अंबड तालुकाध्यक्ष बाळासाहेब काळवणे, साईनाथ चौधरी, दीपक काळवणे, विष्णु काळवणे सहभागी झाले आहेत. मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देणे अपेक्षित होते.यावेळी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने घोषणा देण्यात येत आहे. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पोलिस व तहसील प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप इंगळे, मंडळ अधिकारी बी.बी.भार्डीकर, ग्रामविकास अधिकारी एस.डी.महाजन, पोलिस काँस्टेबल कड, गणेश बर्डे, संदीप कुटे, मिलिंद म्हस्के, गृहरक्षक दलाचे कर्मचारी हे आंदोलकांना टाकीवरून खाली यावे. यासाठी चर्चा करण्यास तयार आहे. मात्र आंदोलक सध्यातरी तयार नाहीत. (Jalna Latest News People Agitation For Maratha Reservation)

हेही वाचा: Maratha Reservation: 'समाजासाठी काळा दिवस, राज्यकर्त्यांना जागा दाखवणार'

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाची बाजु भक्कमपणे मांडली नाही. यामुळेच न्यायालयात आरक्षण टिकले नाही. त्यामुळे सरकारचा जाहीर निषेध करतो.

- नारायण टकले, जालना जिल्हा उपाध्यक्ष, शिवसंग्राम

नोकरीत व शैक्षणिक सुविधा यात आरक्षण कायम करावे, अशी रास्त मागणी होती. सबळ पुरावे असतांना देखील राज्यशासनाने बाजु लावली नाही. म्हणुन सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही.

- बाळासाहेब काळवणे, तालुकाध्यक्ष, शिवसंग्राम