esakal | तुटपुंज्या लस पुरवठ्यामुळे केंद्रांवर रांगा, कोरोना नियमांची ऐसीतैसी
sakal

बोलून बातमी शोधा

जालना - कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकींची लसीसाठी गर्दी.

तुटपुंज्या लस पुरवठ्यामुळे केंद्रांवर रांगा, कोरोना नियमांची ऐसीतैसी

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : पाच दिवसांपासून जिल्ह्यात (Jalna) कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद होते. त्यात बुधवारी (ता.पाच) जिल्ह्यात केवळ 30 हजार कोरोना प्रतिबंधात्मक लस आल्याने गुरूवारी (ता.सहा) सकाळपासूनच लस टोचून घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे लसीकरण केंद्रावर (Corona Vaccination Site) फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहण्यास मिळाले. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पायभूत सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात तब्बल २८६ शासकीय लसीकरण केंद्र उभरण्यात आले असून अनेक राजकीय, व्यापारी संघटना कोरोना लसीकरण शिबिरांचे आयोजन करत आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसी घेण्यास नागरिकांमध्ये जनजागृती झाल्याने लसीकरण केंद्रांवर रांगा लागत आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा (Corona Vaccine) तुटपुंजा परवठा होत आहे. (Jalna Live News Vaccine Shortage At Corona Vaccination Sites In District)

हेही वाचा: Video: औरंगाबादेत कोरोना लसीकरणासाठी गर्दी, नागरिकांना केंद्र बंद करण्याची धमकी

जिल्ह्यात पूर्ण क्षमते लसीकरण करण्यासाठी प्रत्येक दिवसाला किमान २८ हजारांपेक्षा अधिक लसीचे डोस आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्याच्या मागणी प्रमाणे कोरोना लसीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे लसीकरणाची मोहीम कधी बंद तर कधी सुरू अशी गत झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख तीन हजार ६३४ नागरिकांना लस घेण्यात आली आहे. यामध्ये एक लाख ७० हजार ९३१ जणांना पहिला तर ३२ हजार ७०३ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी (ता.पाच) जिल्ह्यात ३० हजार कोरोना लसीचे डोस दाखल झाले. यामध्ये १८ हजार डोस हे कोविशिल्ड व १२ हजार डोस हे कोव्हॅक्सिन होते.