ACB Raid on Jalna Municipal Commissioner
esakal
वाल्मीकनगर रस्ता कामाच्या बिलासाठी आयुक्तांनी लाच मागितली.
ACB पथकाने निवासस्थानावर कारवाई करत १० लाखांची रोकड जप्त केली.
आयुक्त संतोष खांडेकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जालना : शहरातील वाल्मीकनगर येथील रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी दहा लाखांची लाच घेताना जालना शहर महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता.१६) कारवाई केली. खांडेकर यांना शासकीय निवासस्थानातून लाचेच्या (Jalna Bribery Case) रकमेसह ताब्यात घेतले आहे.