
जालना : सेवलीत मध्यरात्री शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना; प्रशासनाची धावपळ
जालना : जालना तालुक्यातील सेवली येथे सोमवारी (ता.१५) रात्रीतुन शिवरायांचा पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. मात्र,हा पुतळा स्थापन करताना प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे पुढे आल्याने अमरावती नंतर जालन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जालना तालुक्यातील सेवलि येथे सोमवारी(ता.१४) रात्री शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा गावात आणला. त्यानंतर रात्रीच हा पुतळाची गावाच्या चौकात स्थापना केली. मंगळवारी (ता.१४) सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची परवानगी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन महसूल प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तहसीलदार श्रीकांत भुजबळ हे घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान गावातील परिस्थिती पाहून पुढील प्रशासकीय प्रक्रिया केली जाईल, असे तहसीलदार श्री. भुजबळ यांनी सांगितला आहे.
Web Title: Jalna Seoli Midnight Shivaji Maharaj Statue Installation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..