

Hingoli News
esakal
जवळा पांचाळ: कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे निसर्गाच्या लहरीपणावर मात करत यावर्षी परिसरातील शेतशिवारांत आंब्याचा मोठा बहर पाहायला मिळत आहे.
बागांमधील आणि बांधावरची झाडे कैऱ्यांनी पूर्णपणे लगडली असून, कैऱ्यांच्या भारामुळे आंब्याच्या फांद्या पार जमिनीपर्यंत वाकल्या आहेत. हे मनमोहक दृश्य पाहून बळिराजा सुखावला आहे.