पक्षीप्रेमींनी लुटला देशी, विदेशी पक्षी निरीक्षणाचा आनंद

जायकवाडी जलाशय : पक्षी महोत्सवात लाहन्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांनी नोंदविला सहभाग
jayakwadi bird sanctuary aurangabad Birdwatchers see various birds
jayakwadi bird sanctuary aurangabad Birdwatchers see various birds sakal

औरंगाबाद : एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फौंडेशन आणि एज्युकेशनल ॲकॅडमी, निसर्ग मित्र मंडळ आणि रोटरी क्लब औरंगाबाद सेंट्रल यांच्यातर्फे घेण्यात दोन दिवसीय पक्षी महोत्सवात रविवारी जायकवाडी जलाशयावर पक्षी निरिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात पक्षी प्रेमींना देश-विदेशातील विविध पक्षी पाहायला मिळाले. यासह या महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

पक्षी निरिक्षणासाठी पिपंळवाडी (पैठण) या ठिकाणी पक्षी प्रेमींना भोरडी मैना, उघड्या चोचीचा करकोचा, छोटा शराटी, राखी बगळा, पाण कावळा, काळ्या शेपटीचा पाणटिवळा, फ्लेमिंगो हे पक्षी अढळून आले. पक्षी महोत्सवात लाहन्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांनी असे शंभर जणांनी सहभाग नोंदविला. महोत्सवात ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी यांनी मार्गदर्शन आणि पक्षाबद्दल माहिती दिली. यासह पक्षीमित्र कुणाल विभांडिक, किरण परदेशी, किशोर गठडी यांनीही मार्गदर्शन केले.

स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप

दोन दिवसीय पक्षी महोत्सवाचा समारोप दुपारच्या सत्रात स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी वेद जहागीरदार यांची उपस्थिती होती. या पक्षी महोत्सवात जवळपास शंभरावर स्पर्धकांनी औरंगाबादमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांची छायाचित्रे काढून पाठविली होती. या सर्वांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. पाच विद्यार्थ्यांनी जैवविविधतेवर प्रेझेंटेशन सादर केले. स्वरदा जोशीने सूत्रसंचालन केले तर कुणार विभांडिक यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com