
पैठण (जि. छत्रपती संभाजानगर) : नाशिक जिल्ह्यात पुन्हा पाऊस झाल्याने पाण्याची होणारी आवक लक्षात घेता येथील जायकवाडी (नाथसागर) धरणातून गुरुवारी (ता. २१) सकाळी सहापासून सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात नऊ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. सध्या हे धरण ९५ टक्के भरलेले आहे. यापूर्वी ३१ जुलैला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.