Jayakwadi Dam: जायकवाडी जुलैमध्येच ७० टक्के भरले; धरणात गतवर्षी हाेता केवळ ४.१३ टक्के पाणीसाठा
Water Level Update: नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेल्या पुराचा मोठा परिणाम जायकवाडी धरणावर झाला असून, जुलैच्या सुरुवातीलाच धरण ७०% भरले आहे.
पैठण : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे. नाशिक येथे गोदावरीला आलेल्या पुरामुळे हा पाणीसाठा वाढला असून, धरण जुलै महिन्यातच ७० टक्के भरले आहे.