ABD26J82806
हिंगोली : जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्योती कोथळकर, प्रियंका चिखलीकर, स्मिता दळवी, सलोखा इंगोले, संजीवनी पडोळे आदी.
----------------
शिवरायांच्या चरणी पणत्यांची आरास
----
हिंगोली, ता. ६: दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाला असून, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी (ता.पाच) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
स्वराज्याची ज्योत पेटवणाऱ्या आणि अन्यायाच्या अंधकाराविरुद्ध लढा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी असंख्य पणत्या प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. पणत्यांच्या मनमोहक आरास आणि दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशाने संपूर्ण पुतळा परिसर उजळून निघाला. शिवरायांच्या चरणी पहिला दिवा अर्पण करून दीपावली साजरी करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला. शिवरायांच्या विचारांचा जागर आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. या दीपोत्सवप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा ज्योती कोथळकर, जिल्हाध्यक्षा प्रियंका चिखलीकर भोयर, उपाध्यक्षा स्मिता दळवी, शहराध्यक्षा सलोखा इंगोले, सचिव संजीवनी पडोळे, कार्याध्यक्षा सुरेखा जगताप, सहकार्याध्यक्षा शारदा दोडके, कल्पना नीळकंठे, अंजली गाढे, कल्पना सोळंखे, सोनाली देशमुख यांच्यासह श्याम सोळंके, योगेश भोयर, जगन्नाथ जगताप, अतिष नीळकंठे, संतोष दोडके यांची उपस्थिती होती.