
जिंतूर : सध्या घरोघरी महालक्ष्मीच्या सणाची लगबग सुरू असताना एका तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता.३१) तालुक्यातील वस्सा येथे घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली. अभिषेक गजानन राऊत (वय २१) असे मृतकाचे नाव असून ग्रामस्थांच्या प्रयत्नातून पाच तासानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.