Water Crisis: अडीच कोटींहून अधिक खर्चूनही नळ कोरडेच ,विहीर आणि पाण्याची टाकी उभारूनही गावाची तहान बारवेवरच

Jivachiwadi Water Crisis: भारत निर्माण आणि जलजीवन मिशनवर दोन कोटींहून अधिक खर्च होऊनही केज तालुक्यातील जिवाचीवाडीत नियमित पाणीपुरवठा नाही. ग्रामस्थांना आजही जुन्या बारवेवर अवलंबून राहावे लागत आहे.
Villagers in Jivachiwadi continue to depend on an old well despite crores spent on water supply schemes.

Villagers in Jivachiwadi continue to depend on an old well despite crores spent on water supply schemes.

esakal

Updated on: 

केज : गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या; मात्र एवढा मोठा निधी खर्च होऊनही ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती कायम असल्याचे चित्र केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे पाहायला मिळत आहे. भारत निर्माण योजनेवर सुमारे ७० लाख रुपये आणि जलजीवन मिशनअंतर्गत दोन कोटींहून अधिक खर्च करूनही गावाला नियमित पाणीपुरवठा होत नाही. नवीन विहीर आणि पाण्याची टाकी उभारूनही गावाची तहान आजही जुन्या बारवेवरच अवलंबून आहे.

Loading content, please wait...